Buldhana Accident : ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या तिघांना वाहनाने उडवले, दोघे ठार

Buldhana Accident : ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या तिघांना वाहनाने उडवले, दोघे ठार
Published on
Updated on

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : Buldhana Accident : मोताळा डिडोळा फाट्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ आहे.

आज शुक्रवार दि.1 ऑक्टोबरच्या पहाटे ही दु:खद घटना घडली. यात अमोल गाढे (वय 20, रा. डिडोळा) व दीपक कायस्थ (वय 45) नगर पंचायत कर्मचारी, मोताळा (रा. देऊळगाव राजा) हे दोघे घटनास्थळीच ठार झाले.

तर कमलेश जुनारे (20) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अकोला येथे शासकीय मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(Buldhana Accident) या अपघातास कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला आहे. बोराखेडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news