copper pot water : तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी अमृतच!!! | पुढारी

copper pot water : तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी अमृतच!!!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपलं आरोग्य जपणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हे आरोग्य जपण्यासाठी तांब्याची भांडी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी (copper pot water) किती गुणकारी ठरतं आणि कोणत्या आजारावर फायद्याचं आहे हे सविस्तर पाहू…

आपल्या घरात शक्यतो करून ताट, वाटी, पेला, बाटल्या… अशी भांडी तांब्यांची असली की, आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तांब्यामध्ये एन्टिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, त्यामुळे होतं काय… तर कर्करोगासारख्या भयंकर आजाराला कारणीभूत असणाऱ्या मुक्त रॅडिक्लसना आणि त्यांच्या दुष्परिणामांना कमी करण्यास मदत करते.

copper pot water

तांब्यामध्ये आपल्या त्वचेसाठी महत्वाचं असणारं ‘मेलेनिन’ हे तत्व असतं. त्यामुळे तत्व आपल्या त्वचेचं नुकसान होण्यापासून वाचवतं आणि अतिनीलपासूनही संरक्षण करतं. शास्त्रज्ञांच्या मते तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने कोलेस्टोराॅल आणि ट्रायग्लिंसराईड्सची पातळीदेखील कमी करते.

copper pot water

इतकंच नाही… आपल्या शरीरातील थायराॅईड ग्रंशी सुरळीत चालण्यास मदत मिळते. तांब्यामध्ये दाहकविरोध गुणधर्म असतात, त्यामुळे सांधेदुखीच्या वेदनादेखील दूर राहण्यास मदत मिळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिरिक्त चरबी कमी करण्यासदेखील खूप मदत करते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलात तर हिमोग्लोबिन तयार होते. शरीरातील लोह शोषण्यास मदत होते. अशक्तपणाही दूर होण्यास हे पाणी खूप लाभदायक आहे. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. रक्त स्वच्छ करण्यास हे पाणी खूप महत्वाचं ठरतं.

copper pot water

आपण आजार दूर करण्यासाठी रासायनिक पद्धतीचे एन्टी-बायोटिक औषधे घेतो. पण, घरातील तांब्यांची भांडी ही नैसर्गिकरित्याच एन्टी-बायोटिक आहेत तांब्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने काॅरला होत नाही. शरीराला डिटाॅक्सदेखील करते.

टीप : रात्रीच्या वेळी तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्या. कारण, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सात-आठ तासांनंतर प्यायल्यांनतर आरोग्यसाठी अतिउत्तम उपाय आहे.

पहा व्हिडीओ : मासिक पाळी दरम्यानच्या दुखण्याला करा दूरकरा नियमित योगासनं

संबंधित बातम्या वाचल्यात का?

Back to top button