Accent syndrome : मेंदूला धक्का बसला आणि ती अमेरिकन शैलीत बोलू लागली…

Accent syndrome
Accent syndrome
Published on
Updated on

हैदराबाद: वृत्तसंस्था : मेंदूला धक्का बसल्याने एका ७० वर्षीय अशिक्षित वृद्धेच्या आयुष्यात मोठीच उलथापालथ झाली. अस्खलित तेलुगू बोलणारी ही महिला अचानक अमेरिकन उच्चारांत तेलुगू बोलू लागली. सर्व तपासण्या नॉर्मल आल्यानंतर चक्रावलेल्या डॉक्टरांनी तिची आणखी तपासणी केली असता, भाषा उच्चाराशी संबंधित असलेल्या मेंदूच्या भागाला धक्का बसल्याने (Accent syndrome ) हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. वाचा नेमके काय आहे प्रकरण.

Accent syndrome : दुर्मिळातला दुर्मीळ मेंदूविकार 

हैदराबाद येथील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर कुमार यांनी याबाबत सांगितले की, शास्त्रीय परिभाषेत याला फॉरेन अॅक्सेंट सिंड्रोम अर्थात एफएएस म्हणून ओळखले जाते. हा एक दुर्मिळातला दुर्मीळ मेंदूविकार आहे. डॉ. सुधीर कुमार म्हणाले की, गेल्या वर्षी ग्रामीण भागातून या महिलेला घेऊन तिचा मुलगा आला. त्याचे म्हणणे असे की, एक दिवस आई सकाळी उठली आणि अचानक वेगळेच तेलुगू बोलायला लागली. अमेरिकन लोक जसा उच्चार करतात, तसे उच्चार करत ती बोलू लागली. आमचे कुणी नातेवाईक अमेरिकेत नाहीत आणि आई कधीच अमेरिकेलाही गेलेली नाही. शिवाय ती अशिक्षितही आहे. डॉ. कुमार म्हणाले की, तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यात तिचे बोलणे कमी गतीने व स्पष्ट शब्दांत उच्चारताना तिला अडचण येत होती. त्यामुळे एखाद्या अमेरिकन माणसाने तेलुगू बोलावे तसे तिचे बोलणे वाटत होते. या वृद्धेची एमआरआय चाचणी केली असता त्यात भाषा उच्चाराशी संबंधित असलेल्या मेंदूच्या भागाला धक्का बसल्याने हा प्रकार झाल्याचे समोर आले. या महिलेवर स्पीच थेरपीसह औषधोपचार केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी तिचे तेलुगू बऱ्यापैकी सामान्य झाले आहे. अशा रुग्णांची स्थिती पूर्ववत होण्यात बराच कालावधी लागतो, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात ही महिला घराबाहेर पडलीच नाही. त्यामुळे हा प्रकार होताच मुलाने तिच्यात अतिताणामुळे बोलण्यात बिघाड झाला असावा, असे समजून मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेतली. त्यांना तिच्या वर्तनात संशयास्पद काहीच न आढळल्याने मेंदूविकार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news