Ali Baba: Dastaan-E-Kabul : शीझान खानच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

sheezan khan-abhishek nigam
sheezan khan-abhishek nigam
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषाच्या मृत्यूनंतर अली बाबा- दास्तान ए काबुल' या टीव्ही शोची अवस्था फारच वाईट झाली आहे. या मालिकेत शीझान खान अली बाबाची भूमिका निभावत होता तर शहजादीच्या भूमिकेत तुनिषा शर्मा होती. तुनिषाने (Ali Baba: Dastaan-E-Kabul) आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता आणि तिचा सहकलाकार शीझान तुरूगांत आहे. त्यामुळे आता मुख्य अभिनेत्याशिवाय मालिका चालवणे निर्मात्यांना अवघड झाले आहे. दरम्यान, शीझान खानच्या जागी नवा चेहरा कोण असणार याची चर्चा होती. आता अभिनेता अभिषेक निगमचं नाव चर्चेत असल्याची माहिती समोर आलीय. (Ali Baba: Dastaan-E-Kabul)

तुनिषा शर्मा या अभिनेत्रीने सेटवरील मेकअप रूममध्ये आपले जीवन संपवले होते. त्यामुळे सेटवर भीतीचे वातावरण आहे. मालिकेतील टीम सेटवर यायला घाबरत असल्याने मलिकेच्या निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत आहे. हा शो ऑफ एअर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काही जुने एपीसोड प्रसारित करून त्यानंतर कथा एका नवीन ट्रॅकवर वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका मालिकेचा शो बंद होऊन लवकरच दुसरा चॅप्टर प्रक्षेकांच्या समोर येणार आहे, अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, शीझान खानच्या जागी नवा अभिनेता अभिषेक निगमची एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोण आहे अभिषेक निगम?

अभिषेक निगम एक अभिनेता आहे. त्याने 'अकबर- रक्त से तख्त का सफर' आणि 'हीरो गायब मोड ऑन' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय त्याने 'आशुतोष गोवारिकर' दिग्दर्शित चित्रपट 'पानीपत'मध्ये 'विश्वास राव' यांची भूमिका साकारली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news