Rinku Rajguru : अपने रंग में मुझको रंग दे; रिकूच्या हास्याची जादू (video)

Rinku Rajguru : अपने रंग में मुझको रंग दे; रिकूच्या हास्याची जादू (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: सैराट फेम आणि मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या ( Rinku Rajguru ) एकापेक्षा एक फोटोंनी सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. कधी वेस्टर्न तर कधी जीन्समध्ये सर्व प्रकारच्या आऊटफिटमध्ये ती कमालीचे सुंदर दिसते. रिंकूच्या सध्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुने ( Rinku Rajguru ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये एका खुर्चीवर बसलेली दियतेय. तर तिने आपल्या केसांची पोनी बांधून साजेशीर दागिने परिधान केले आहेत. या फोटोतील खास म्हणजे, रिंकू लाजताना दिसतेय. याशिवाय तिच्या पाठिमागे 'अपने रंग में मुझको रंग दे, धिम्मी- धिम्मी रंग में मुझको रंग दे ना ,सौंधे – सौंधे रंग मुझको रंग दे, रंग दे ना, रंग दे ना.' या हिंदी गाण्याचे बोल ऐकायला मिळत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'सौंदर्य म्हणजे, सुंदर चेहरा नसून ते सुंदर मन, सुंदर हृदय आणि सुंदर आत्मा ️❤️.' असे म्हटले आहे. साधी दिसणारी रिंकू खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. यातील रिंकूच्या चेहऱ्यावरील हास्याने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय तिने आपल्या गाळावर हात ठेवत हटके पोझ पाहायला दिली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टसचा पाऊस पाडत आहेत. यात एका नेटकऱ्यांनी '?? क्यूट', 'Nice???', 'अती सुंदर ?❤️', 'so sweet eyes ❤️❤️❤️', तर दुसऱ्या नेटकऱ्याने 'Cute smile ❤️??', 'Very hottt???', 'Mast??', 'The most gorgeous girl ???', 'Chan ❤️❤️❤️', 'Red rose', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

यासिवाय काही चाहत्यांनी खास असे हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी दिग्दर्शक नागराज मंजुळेंना दुसरा चित्रपट बनवण्याचा आणि रिकूला तिच्यावर हिंदी गाणी सूट होत नसल्याचा सल्ला दिला आहे. याआधी रिंकूने फिकट आकाशी रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीतील फोटो शेअर केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Magic happens when you start loving yourself'. असे लिहिले होते. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले होते.

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. या चित्रपटात ती आर्चीच्या भूमिकेत होती. विशेष म्हणजे, तिचा सैराट चित्रपटानंतर लूक बदललाय. अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या रिंकूला त्या – त्या भूमिकेसाठी स्वत:च्या शरीरयष्टीमध्ये बदल करावा लागलाय. ज्यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली दिसते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news