सोलापूर : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर येथे माथेफिरू तरुणीने रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी (दि.२१) सकाळी 7:30 च्या दरम्यान धिंगाणा घातल्याने खळबळ उडाली. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील उच्च श्रेणी वेटिंग रूमची तोडफोड केली. सकाळीच प्रवाशांची लगबग सुरू असतानाच अचानक पणे असे घडल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले.
माहितीनूसार, सोलापूर रेल्वे स्थानकावर माथेफिरू तरुणीने धिंगाणा घालायला सुरुवात केली. तिने रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील उच्च श्रेणी वेटिंग रूमचीही तोडफोड केली. तिने उच्च श्रेणी वेटिंग रूमच्या सर्व काचा फोडल्या, आतील खुर्च्यांची मोडतोड केली. सकाळची वेळ, प्रवाशांची लगबग सुरू असतानाच अचानक पणे असे घडल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. तरुणीच्या हातात रॉड-लोखंडी सळई सारखी वस्तू असल्याने तिला रोखण्यासाठी जाण्याचे धाडस कुणी केले नाही. काही वेळाने त्या तरुणीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले आहे. अद्याप तिचे नाव समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा