पुढारी ऑनलान डेस्क : UP News : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधील एका खाजगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णाला ब्लड प्लेटलेस्ट ऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवल्याची घटना समोर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे घटना समोर आली. प्रयागराजसह संपूर्ण राज्यात घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओला संज्ञानात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या रुग्णालायाल सील करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने आरोपाचे खंडन केले असून व्हिडिओ पूर्णपणे 'फर्जी' असल्याचा दावा केला आहे.
प्रदीप पांडे (रा. बमरौली), असे मयताचे नाव आहे. तर 'ग्लोबल हॉस्पिटल एंड ट्रामा सेंटर', असे सील केलेल्या रुग्णालयाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बमरौली निवासी प्रदीप पांडे यांना डेंग्यू झाल्याने 14 ऑक्टोबर रोजी पीपल गांवातील ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर मध्ये भर्ती केले गेले होते. 16 ऑक्टोबरला प्लेटलेट्स 17 हजारवर पोहोचल्यामुळे डॉक्टरांनी पाच यूनिट आणायला सांगितले होते. त्यापैकी त्यांना रात्री उशिरापर्यंत तीन यूनिट प्लेटलेट्स चढवण्यात आले. मात्र प्लेटलेट्स चढवल्यानंतर प्रदीपचा त्रास आणखीनच वाढत गेला. त्यामुळे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी रुग्णाला दूस-या रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले. जिथे 19 ऑक्टोबरला प्रदीपचा मृत्यू झाला.
याप्रकरणी प्रदीपचा मेहूणा सौरभ त्रिपाठी याने जॉर्जटाऊन मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयातील काही लोकांनी त्यांना पाच हजार प्रति यूनिटच्या हिशोबाने प्लेटलेट्स दिल्या. प्लेटलेट्सच्या बॅगवर एसआरएन रुग्णालयाचा टॅग लावलेला आहे.
सौरभने आरोप केला आहे की रुग्णालय प्रशासनाने प्लेटलेट्स ऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवला. त्याचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायलरल झाला आहे. हा व्हिडिओ उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचल्यानंतर उपमुख्यमंत्री त्यांनी सीएमओ डॉ. नानक सरन यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी रुग्णलायाला सील करण्यात आले. तसेच तपासासाठी तीन सदस्यीय टीम तयार केली आहे. उरलेल्या प्लेटलेट्स ड्रग विभागच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
UP News : मला रुग्णालय प्रशासनाने आठ यूनिट प्लेटलेट्स आणायला सांगितले होते. रुग्णालयाचे संचालक सौरभ मिश्रा आणि त्यांच्या मुलाने प्रति युनिट पाच हजाराच्या हिशोबाने पाच यूनिट प्लेटलेट्स दिल्या. जेव्हा प्रदीपची तब्येत बिघडली तेव्हा त्याला दुस-या रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आले.
– सौरभ त्रिपाठी, मयताचा मेहुणा
UP News : रुग्ण पूर्वीपासूनच हृदय रोगी होता. प्लेटलेट्स स्वरुप राणी रुग्णालयातून मागवण्यात आली आहे. तेथील कागद आणि रिसिप्ट्स माझ्याजवळ आहे. रुग्ण दुस-या रुग्णालयात हलवल्यानंतर दोन दिवसांनी दगावला. त्यामुळे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत
– सौरभ मिश्रा, संचालक, ग्लोबल हॉस्पिटल आणि ट्रामा सेंटर
UP News : हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांनी संज्ञानात घेऊन त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ रुग्णालय सील करण्यात आले आहे. याशिवाय प्लेटलेट्स सॅम्पल तपासणीसाठी ड्रग विभागातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
– डॉ. नानक सरन, मुख्य चिकित्साधिकारी प्रयागराज
हे ही वाचा :