सांगली : पावणे अठरा लाखांची वीज चोरी; एकावर गुन्हा दाखल

सांगली : पावणे अठरा लाखांची वीज चोरी; एकावर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथील विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीररित्या वीज वापर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बाबासाहेब चौगुले असे या व्यक्तीचे नाव आहे. महावितरणाने चौगुले यांच्यावर महावितरणची फसवणूक करून छुप्या मार्गाने वीज वापर केल्याप्रकरणी १७ लाख ८४ हजार ८५० रुपये दंड आकारत जत पोलिसात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भरारी पथकाचे अधिकारी महेशकुमार श्रीरंग राऊत (मूळ गाव अकलूज, सध्या रा. विश्रामबाग सांगली) यांनी फिर्याद दाखल केली.

याबाबत अधिक माहिती अशी, विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत महादेव चौगुले यांचा लघु उद्योग आहे. लघु उद्योगासाठी औद्योगिक वीज वापर म्हणून चौगुले यांनी थ्री फेज कनेक्शन घेतले होते. चौगुले यांनी विद्युतमीटर नादुरुस्त दाखवून दोन वर्ष बेकायदेशीररित्या विजेचा वापर केला. याची माहिती वीज चोरी भरारी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार अधिकारी महेशकुमार श्रीरंग राऊत यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये चौगुले यांच्या वीज वापराबद्दल पाहणी केली. वीज चोरीची खातरजमा करून त्यांनी १७ लाख ८४ हजार ८५० रुपये दंड आकारत जत पोलिसात फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

    हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news