नानगाव; पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा.मा. ( ता.दौंड ) येथील ग्रामपंचायतचे लेटरपँड, शिक्का आणि सरपंच यांची बनावट सही करून गावच्या हद्दीतील पिर दर्ग्याची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्याकडे नोंद करण्यासाठी संगनमत करुन फसवणूक केल्या प्रकरणी अकरा जणांवर फसवणूक केल्याचा गुन्हा यवत पोलिस स्टेशन येथे ११ नोव्हेंबराला दाखल करण्यात आला आहे.
पारगाव सा.मा.येथील सरपंच जयश्री शरद ताकवणे यांनी ही तक्रार दाखल केली असून यामध्ये राजू शहाबुद्दीन शेख, अजिज मुन्सीभाई शेख, कमरुद्दीन रमजानभाई शेख, महम्मद लालाभाई शेख, दस्तगीरभाई मिठुभाई पठाण, शहाबुद्दीन पापाभाई शेख, सोहेल बादशहा पठाण, बादशहा सिकंदर पठाण, अजिज समशेरभाई शेख, समीर शहाबुद्दीन शेख, सना फकिरभाई पठाण यांच्यावर ग्रामपंचायत पारगावची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.