आयशर टेम्पोला मागून कार धडकली ; नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा अपघात

आयशर टेम्पोला मागून कार धडकली ; नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा अपघात
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील बनकरफाटा (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री ८ च्या सुमारास रस्त्याकडेला आयशर टेम्पो (एमएच ०४ एफयू ८२८१) उभा होता. या टेम्पोला भरधाव वेगात आलेल्या स्कोडा या चारचाकीने मागील बाजूने धडक दिली. यामध्ये टेम्पोमागे उभा असलेला टेम्पोचालक मनोहर अप्पाराव इंगळे (वय ६१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार कल्याणच्या दिशेला जात असताना बनकर फाटा येथील वनखात्याचे रोपवाटिकेसमोर हा गंभीर अपघात झाला.

या अपघातात रमाबाई बाळू शिद व नाना गोमू शिद (दोघेही रा. सावरीची वाडी, ता. मुरबाड, जि. ठाणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्कोडा कार (एमएच ४६ एपी ९७१९) ही भरधाव वेगात येऊन आयशर टेम्पोला धडकली असून, ती डिंगोरे (ता. जुन्नर) गावातील आहे. कारचालक नशेत तरर्र असल्याने अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर कारचालकास जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने कारचालक खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. अधिक तपासात कारचालक आणि मालक यांची माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. डी. गेंगजे करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news