जम्मू काश्मीर : पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरला गुरुवारी (दि.५) रोजी पहाटे ५.३५ वाजण्याच्या सुमारास जोरदार भूंकपाचा धक्का (Earthquake ) बसला. या भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी रिश्टर स्केलवर असून काश्मीर ते तजाकिस्तानपर्यंत भूकंपाचे हादरे बसले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील तजाकिस्तान येथे १७० किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिदू असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, अद्याप कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. सकाळीच भूंकपाचा धक्का बसल्याने या भागातील नारिकांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या महिन्यातीस सोमवारी (दि. १८ ) रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी होती. यावेळी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सोमवारी सकाळी १२. ९ वाजण्याच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचा धक्का बसल्याचे म्हटले होते. यानंतर घाबरून येथील नागरिक घराबाहेर पडल्याचे सांगितले होते.
हेही वाचलंत का?