पुढारी ऑनलाईन: सध्या भारतीय क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्या आणि कसोटीच्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळत आहे. मर्यादित षटकांचे कर्णधारपद रोहित शर्माकडे तर कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे.
रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद स्वीकारले आहे. त्याचबरोबर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेटचे बलस्थान आहेत आणि बीसीसीआयसह, आयपीएल फ्रँचायझी देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार कोहली आणि रोहित ग्रेड A+ मध्ये येतात. दोघांना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात.
बीसीसीआय व्यतिरिक्त त्यांना आयपीएलमधूनही मोठी रक्कम मिळते. त्यांच्या फ्रँचायझी या दोन स्टार खेळाडूंना करोडो रुपये देतात.
या दोघांना BCCI कडून 7-7 कोटी मिळतात, पण IPL मध्ये मिळणाऱ्या पगारात तफावत आहे. रोहितला मुंबई इंडियन्सने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. तर त्याचवेळी आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणाऱ्या कोहलीला 15 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
रोहित हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. 2013 च्या हंगामात रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2015, 2017, 2019 आणि 2020 ची ट्रॉफी जिंकली
कोहली हा 2013 ते 2021 पर्यंत आरसीबीचा कर्णधार होता. तो आपल्या संघाला एकदाही चॅम्पियन बनवू शकला नाही. 2021 च्या हंगामात संघ एलिमिनेटरमध्ये पोहोचला. कोहलीच्या नेतृत्वाखाली, आरसीबी 2016 च्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचले होते, जिथे त्यांना सनरायझर्स हैदराबादने पराभूत केले होते.