या राज्याला सरकार आहे की नाही मला माहीत नाही; मी अन्याय सहन करणार नाही : नारायण राणे | पुढारी

या राज्याला सरकार आहे की नाही मला माहीत नाही; मी अन्याय सहन करणार नाही : नारायण राणे

कणकवली; पुढारी ऑनलाईन

कणकवलीतील शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे कणकवलीतील आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

त्याचवेळी शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून ‘म्यॉव म्यॉव’ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेत नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, नितेश राणे ‘नॉट रिचेबल’ असून, त्यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, नितेश राणे नॉट रिचेबल झाल्यानंतर नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी म्याव म्याव वरून प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. मांजरीचा आवाज काढल्यास राग का यावा? वाघाचे मांजर कधी झाले असा उलटप्रश्न त्यांनी केला.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार? नारायण राणे नागपुरातून थेट कणकवलीत

जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराचे पाप लपवण्यासाठी सर्व काही चाललं आहे, तसेच नितेश राणेंना निवडणुकीतून रोखण्यासाठी चाललं आहे असा आरोप त्यांनी केला. एका आमदारासाठी एवढी यंत्रणा का लावली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button