माेठी बातमी : ‘सगेसाेयरे’ प्रश्‍नी जरांगे- पाटील यांचा सरकारला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम, उपाेषण स्‍थगित

जरांगे पाटील ( संग्रहित छायाचित्र )
जरांगे पाटील ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी १३जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस निर्णय घ्‍यावा, अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही. सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू,  असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना दिला. तसेच त्‍यांनी १३ जुलैपर्यंत आपले बेमुदत उपाेषणही स्‍थगित केले आहे.

दिलेला शब्द पाळणार : शंभुराज देसाई

मराठा आरक्षण प्रश्‍नी जरांगे पाटील यांच्‍या बेमुदत उपाेषणाचा आज सहावा दिवस आहे. आज अंतरावली सराटीमध्‍ये मंत्री शंभुराज देसाई यांनी त्‍यांची भेट घेतली.  जरांगे-पाटील यांच्याशी बोलत असताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, " राज्यसरकार मराठा आरक्षण प्रश्नी दिलेला शब्दाचे पालन करेल. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध नाही; पण सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी घाई नको. उद्या (दि.१४) उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत. तुमचाही एक प्रतिनीधी या बैठकीला पाठवा. आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी द्या. आचारसंहितेत वेळ गेल्यामुळे थोडं सहकार्य करा,  असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

नावे घेवून उमेदवार पाडू…

मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी १३ जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस निर्णय घ्‍यावा, अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही. सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नावे घेवून उमेदवार पाडू,  असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आज एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करत आहे, मात्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास १३ जुलैनंतर आम्ही सरकारला वेळ देणार नाही. त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news