BJP Sankalp Patra 2024 : भाजपचे संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान मोदींची गॅरंटी : फडणवीस | पुढारी

BJP Sankalp Patra 2024 : भाजपचे संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान मोदींची गॅरंटी : फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा (BJP Sankalp Patra 2024) भाजपने रविवारी घोषित केला. यावर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपचे हे केवळ संकल्प पत्र नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे आज (दि.१५) माध्यमांशी ते बोलत होते. भाजपचे संकल्पपत्र अत्यंत व्यापक असून ते महिला, युवा, गरिबांना समर्पित आहे. या ‘संकल्प पत्र’मध्ये महिला, गरीब आणि समाजातील सर्व घटकांसाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी संविधानाची पूजा करून पद स्विकारले आहे. मोदींनी ७५ गँरंटी दिल्या आणि पूर्णही केल्या. काँग्रेस कधीच अश्वासन पूर्ण करत नाही. संविधान बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. संविधान बदलण्याचा आरोप करणे हा काँग्रेसचा जुमला आहे. काँग्रेसकडून ओबीसी आरक्षणाची गळचेपी करण्यात आली. त्यामुळे ओबीसींवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

हेही वाचा : 

Back to top button