भाजपच्या जाहीरनाम्यातून महागाई, बेरोजगारी गायब : राहुल गांधींची टीका | पुढारी

भाजपच्या जाहीरनाम्यातून महागाई, बेरोजगारी गायब : राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपने रविवारी घोषित केलेल्या  संकल्पपत्रावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तीव्र टीका केली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातून महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर भाजप कधीही चर्चा करीत नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात बेरोजगारीच्या प्रश्नावर कुठलेही ठोस आश्वासन दिले नसताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मात्र देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी स्पष्ट योजना आखली आहे. इंडिया आघाडीने देशात ३० लाख बेरोजगार युवकांची भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला १ लाखाची स्थायी नोकरी देण्याचा आमचा निर्धार आहे. मोदींच्या भूलथापांना आता युवक बळी पडणार नाही. काँग्रेसचा हात मजबूत करून देशातील युवक वर्ग रोजगार क्रांती घडवून आणणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Back to top button