BJP Manifesto 2024: जाणून घ्या, भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये | पुढारी

BJP Manifesto 2024: जाणून घ्या, भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करतानाच “जीवायएएन” अर्थात “ग्यान” संकल्पनेखाली गरीब, युवक, अन्नदाता शेतकरी आणि नारी, या चार शक्तींच्या बळकटीसाठी काम करण्याचा निर्धार असलेला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने रविवारी घोषित केला. “मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत -२०४७” संकल्पपत्र, असे नाव दिलेल्या या जाहीरनाम्यात केंद्रसरकारने गरिबांसाठी सुरू केलेली मोफत अन्नधान्य योजना पुढील पाच वर्षांसाठी देखील सुरू राहील, अशी “मोदी गॅरंटी” नमूद आहे. भाजपने सर्वच वर्गातील लोकांसाठी अशा २४ मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत. तर मग जाणून घेऊया  भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये BJP Manifesto 2024
BJP Manifesto 2024  भाजपच्या जाहीरनाम्यातील युवकांसाठी घोषणा
देशात पारदर्शकपणे व कालबद्धरित्या सरकारी भरती केली जाईल.
“स्टार्ट अप” साठी इकोसिस्टीम उभारून फंडिंगचा विस्तार केला जाईल.
 “स्टार्टअप”ला मेंटरशीप देऊन शासकीय खरेदीत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.
युवकांना उत्पादन क्षेत्रात अधिक संधी प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प  नमूद आहे.
शेतकऱ्यांसाठी भाजपच्या योजना
पीएम शेतकरी योजनेत केंद्रसरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी  ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ही योजना आणखी बळकट केली जाणार आहे.
डाळ आणि खाद्य तेलाच्या उत्पादनात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याची योजना आहे.
भाजी उत्पादन आणि स्टोरेजसाठी नवीन क्लस्टर निर्मिती करण्याचे धोरण आहे.
कृषी संशोधनाच्या सुविधा वाढवून नैसर्गिक शेती आणि सिंचन सुविधांचा विस्तार करण्याचा संकल्प आहे.
 सहकार क्षेत्रातील जगात सर्वात मोठ्या असलेल्या अन्नधान्य भांडार योजनेखाली (पीएसीएस) प्रमुख क्षमतेचा विकास करण्याची योजना आहे.
 ७० वर्षांवरील  ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान योजनेत ५ लाखांपर्यंतच्या आजारावर मोफत उपचार
गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्य वाटप योजना २०२९ पर्यंत सुरूच ठेवली जाणार
गरिबांना आणखी ३ कोटी घरे बांधून देण्यासाठी योजना राबविणार
मुद्रा योजनेत कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढविणार
 “सीएए” कायद्याअंतर्गत लोकांना नागरिकत्व प्रदान करणार, समान नागरी कायदा अजेंडयावर असणार
वन नेशन वन इलेक्शन लागू करणार
पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणणार
शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळण्यासाठी “एमएसपी” वाढविण्यासह शेतकरी सन्मान निधी योजना सुरू ठेवणार
मुंबई-अहमदाबाद सोबतच देशाच्या चारही दिशांमध्ये बुलेट ट्रेन चालविणार
मच्छीमारांसाठी विमा योजना आणि मत्स्यसंपदा योजनेचा विस्तार करणार, मोतीच्या शेतीला प्रोत्साहन देणार
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुलभ कायदे करून विमा योजना राबविणार
दिव्यांगांसाठी घरे आणि स्वस्त उपकरणे उपलब्ध करून देणार
तृतीयपंथीयांना आयुष्मान योजनेत समाविष्ट करून त्यांना योजनेचा लाभ देणार
आयआयटी, आयआयएम या नवीन संस्थांची स्थापना करणार, कौशल्य विकासासाठी इंटर्नशीप सुरू करणार
रस्ते, रेल्वे, विमानतळ ईव्ही चार्जिंग स्टेशन, ६ जी तंत्रज्ञान आदी पायाभूत सुविधांचा विकास करणार
हेही वाचा 
 

Back to top button