Lok Sabha Election : हिंगोली : लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी बारा उमेदवारांकडून सोळा अर्ज दाखल | पुढारी

Lok Sabha Election : हिंगोली : लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी बारा उमेदवारांकडून सोळा अर्ज दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी आज 12 उमेदवारांकडून 16 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. (Lok Sabha Election)

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली. या मतदार संघासाठी दि. 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या पाचव्या दिवशी 18 उमेदवारांना 71 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 103 इच्छुक उमेदवारांना 374 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर पाचव्या दिवशी आज बुधवार, दि. 03 एप्रिल रोजी 12 उमेदवारांनी 16 नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या 26 झाली आहे. आज दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (Lok Sabha Election)

नागेश बाबूराव पाटील आष्टीकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) दोन अर्ज, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) एक अर्ज, मनोज आनंदराव देशमुख (अपक्ष) एक अर्ज, बाजीराव बाबुराव सवंडकर (अपक्ष) तीन अर्ज, रवि यशवंतराव शिंदे (अपक्ष) एक अर्ज, अशोक वामनराव पाईकराव (अपक्ष) एक अर्ज, अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लिग)दोन अर्ज, संजय श्रावण राठोड (अपक्ष) एक अर्ज, अशोक पांडूरंग राठोड (अपक्ष) एक अर्ज, धनेश्वर गुरु आनंद भारती (अपक्ष) एक अर्ज, राजू शेषेराव वानखेडे (अपक्ष) एक अर्ज व . शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असून उद्या गुरुवार, दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा :

Back to top button