हिंगोली : कार-दुचाकी अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

माय-लेकाचा जागीच मृत्यू
माय-लेकाचा जागीच मृत्यू

आडगाव रंजे; पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यातील दारेफळ येथील शिवाजी भालेराव व त्यांच्या आई हे दोघे दुचाकीवरून परभणी येथे दवाखान्यात जात होते. यावेळी परभणी-वसमत रोडवरील चिखली पाठी जवळ त्‍यांच्या दुचाकीचा आणि कारचा अपघात झाला. यामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान आई गयाबाई भालेराव (वय 50) शिवाजी भालेराव (30) यांचे जवळाबाजार येथे मोबाईल शॉपीचे दुकान होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग पोलीस पीएसआय गिरी अरविंद गजभार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मनमिळावू स्वभावाच्या मायलेकाचा अशाप्रकारे मृत्‍यू झाल्‍याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news