Raigad Murder : पेण हादरले! लॉज व्यवस्थापकाचा गुप्तांग कापून खून; वडखळ येथील घटना | पुढारी

Raigad Murder : पेण हादरले! लॉज व्यवस्थापकाचा गुप्तांग कापून खून; वडखळ येथील घटना

पेण; पुढारी वृत्तसेवा : पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लाॅजच्या व्यवस्थापकाचा एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने गळा आणि गुप्तांग कापून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि. ६) रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वडखळ पोलीस या घटनेतील फरार आरोपीचा तपास करत आहेत. (Raigad Murder)

या घटनेची फिर्याद संदिप बाळु पाटील (रा. वडखळ) यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यातील वडखळ मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) रात्री 10 वाजताच्या सुमारास सावली लॉज व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह (वय 40 वर्ष, रा. वडखळ ता. पेण, जि. रायगड) यांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सावली लॉज रूम नं. ११५ मध्ये अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याचा गळा चिरुन गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Raigad Murder)

आरोपींने खून करुन दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. लॉजच्या कर्माचाऱ्यांना शोधाशोध सुरु केली. यावेळी त्यांना एका रूममध्ये व्यवस्थापाकचा मृतदेह आढळून आला. या घटनेची फिर्याद संदिप बाळू पाटील (रा. वडखळ) यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

या खूनाची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी भेट देवून घटनेची पाहणी केली आहे. अज्ञाताविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे हे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button