Hingoli Murder Case : डिग्रसवाणी येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; क्राईम पेट्रोल, दृश्यम सिनेमा पाहून रचला खुनाचा कट | पुढारी

Hingoli Murder Case : डिग्रसवाणी येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; क्राईम पेट्रोल, दृश्यम सिनेमा पाहून रचला खुनाचा कट

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डिग्रसवाणी येथील तिहेरी खून प्रकरणात आरोपीने नातेवाईकांमध्ये केली जात असणारी बदनामी व खर्चासाठी पैसे देत नसल्यामुळे आईवडिलांसह भावाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अतिशय शांत डोक्याने नियोजनबध्द पध्दतीने त्याने हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महेंद्र जाधव याने आई-वडील व भावाचा खून करण्यापुर्वी दृश्यम सिनेमा व क्राईम पेट्रोल मालिका सातत्याने पाहून त्यातून त्याला खुनाची कल्पना सुचली. खून करून पोलिसांना गुंगारा देण्याचा महेंद्र याचा मानस होता. परंतु पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या. Hingoli Murder Case

डिग्रसवाणी येथील कुंडलीक जाधव, कलावती जाधव व आकाश जाधव यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी कुंडलीक व कलावती यांचा मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्क पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विलास चवळी, जमादार नाना पोले यांच्या पथकाने मागील ३ दिवसांपासून तपास सुरु केला होता. यामध्ये पोलिसांनी संशयित महेंद्र याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातून माहिती मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. Hingoli Murder Case

नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याने रचला खूनाचा कट

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व बासंबा पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर त्याने तोंड उघडले. तिघेही माझी नातेवाईकांमध्ये बदनामी करीत होते. तसेच खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. यामध्ये त्याने वाशीम येथून झोपेच्या तीस गोळ्या आणल्या. त्यानंतर ९ जानेवारीरोजी त्या गोळ्या चहा मधून वडील, आई व भाऊ यांना दिल्या. तिघेही गुंगीत असताना रात्री आकाश याला विजेचा शॉक दिला. त्यानंतर त्याच्या डोक्यात रॉड मारून खून केला. त्यानंतर त्याला डिग्रसवाणी शिवारात खड्डयात फेकून दिले.

त्यानंतर १० जानेवारीरोजी दुपारी आई कलावती यांना शेतात नेऊन डोक्यात रॉड मारून ठार केले. व आकाशला फेकलेल्या ठिकाणी टाकून दिली. तर रात्रीच्या वेळी वडील कुंडलीक यांच्या डोक्यात रॉड मारून खून केला. अन् त्यांचा मृतदेह खड्डयात फेकून दिला. यावेळी अपघाताचा बनाव दाखविण्यासाठी दुचाकीचा हेडलाईट फोडून दुचाकी खड्डयात ढकलून दिल्याचे पोलिसांना सांगितले. वाशीम येथून एकाच वेळी झोपेच्या ३० गोळ्या कशा खरेदी केल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुसार आता पोलिसांनी चौकशी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

Hingoli Murder Case  : घेवारे यांची पुन्हा चमकदार कामगिरी

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यावर या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सोपविली होती. घेवारे यांनी बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांना सोबत घेत अत्यंत कौशल्यपूर्व विचारपूस करीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. पोलिसी खाक्या दाखविताच महेंद्र जाधव याने खुनाची कबुली दिली. घेवारे यांनी या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा 

Back to top button