रायगड : ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात | पुढारी

रायगड : ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात

रायगड ; पुढारी वृत्‍तसेवा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणेरे इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्‍या पार्श्वभूमीवर आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पहाटे ताब्‍यात घेतलं.

पोलिसांनी बजावल्या होत्या शिवसैनिकांना नोटीसा

लोणेरे तालुका माणगाव येथे आज होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला विरोध करण्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निर्णयासंदर्भात पहाटे पोलिसांकडून महाड विधानसभा क्षेत्रातील 31 ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button