Rozgar Mela: देशभरातील ७१ हजार युवकांना उद्या मिळणार रोजगार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rozgar Mela: देशभरातील ७१ हजार युवकांना उद्या मिळणार रोजगार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी (दि.१२) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्यात देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी गतवर्षीच्या २२ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा पार पडला होता.

ज्या पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत, त्यात ट्रेन मॅनेंजर, स्टेशन मास्तर, वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लार्क, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अकाउंटंट, पोस्टल अकाउंटंट, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, जेई/सुपरवायझर, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी अधिकारी, सहाय्यक, एमटीएस आदी पदांचा समावेश आहे.

रोजगार मेळाव्याचे निमित्त साधत पंतप्रधान यावेळी युवकांना मार्गदर्शनही करणार आहेत. रोजगार प्राप्त युवकांना 'कर्मयोगी प्रारंभ' च्या माध्यमातून स्वतः प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्मयोगी प्रारंभ ही नव्याने नेमण्यात आलेल्या लोकांसाठीचा एक ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news