यंदा देशात साधारण मान्सून बरसणार; 96 टक्के पावसाचा अंदाज | पुढारी

यंदा देशात साधारण मान्सून बरसणार; 96 टक्के पावसाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सून साधारण बरसेल असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला. देशात जून ते सप्टेंबर या काळात एकूण 87 सेमी पाऊस पडेल. असेही अंदाजात म्हटले आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे 96 टक्के पडेल आसा अंदाज आहे. आम्ही 1951 ते 2022 या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. देशात एकूण 87 सेंटीमीटर पाऊस होईल याच्या 96 टक्के म्हणजे 83 सेमी (830 मी मी) इतका पाऊस होईल.

जुलै पासून अल नीनो सक्रिय..

डॉ महापात्रा म्हणाले, प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या अल निनो व ला नीना या दोन प्रक्रियाचा भारतीय मान्सून वर प्रभाव होतो. ला नीना पावसासाठी चांगली तर अल नीना पावसासाठी नकरात्मक आहे असे गृहीतक आहे. मात्र सध्या या दोन्ही परिस्थिती प्रशांत महासागरात नाहीत. ती परिस्थिती तटस्थ (नुट्रल ) आहे, मात्र भारतात जुलै मध्ये अल निनो सक्रिय होत आहे. त्यामुळे पाऊस कमी पडेल असे काही लोक भाकीत करीत आहेत. असे असले तरी भारतीय समुद्री स्थिरांक व युरेशियन बर्फ़ाळ प्रदेशातील आच्छादनाचा परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. या दोन्ही परिस्थिती सकारात्मक आहेत त्यामुळे जुलै नंतर पाऊस चांगला पडू शकेल.

अल नीना चा मान्सूनशी संबंध 40 टक्केच ..

महापात्रा म्हणाले, आजवर 15 वेळा ला नीना सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. ला नीना चा मान्सूनशी 40% संबध गृहीत धरला जातो. त्यामुळे जुलै नंतर पाऊस कमी पडेल हा फक्त अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. पण आयओडी (भारतीय समुद्री स्थिरांक) व युरेशिया तील बर्फाच्छादन ही परिस्थिती भारतीय मान्सून ला सकारात्मक आहे.

Back to top button