Diabetics and Fruit Intake : मधुमेहींसाठी कोणती फळे चांगली ? जाणून घ्‍या सविस्‍तर

Diabetics and Fruit Intake : मधुमेहींसाठी कोणती फळे चांगली ? जाणून घ्‍या सविस्‍तर

मधुमेहांच्या रुग्णांसाठी फळाचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे फळातील व्हिटॅमिन आणि फायबर यांचा पुरवठा शरीराला होऊ शकतो. ही फळे खाण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांनी आपली औषधेही नियमितपणे घेतली पाहिजेत. स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा कोणी तरी सांगते आहे म्हणून आपली औषधे बंद करू नयेत. आपल्या रक्तशर्करेची तपासणी नियमितपणे करून घ्यावी. फळे खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( Diabetics and Fruit Intake )

Diabetics and Fruit Intake : मधुमेहांच्या रुग्णांसाठी जांभूळ  सर्वात उपयुक्त

जांभूळ : मधुमेहांच्या रुग्णांसाठी जांभूळ हे सर्वात उपयुक्त फळ आहे. जांभळामध्ये व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंटस् आणि तंतुमय पदार्थ (फायबर) यांचे प्रमाण मोठे असते. अर्धे भांडे भरून जांभळे खाल्ल्यास फक्त 62 कॅलरी शरीराला मिळतात आणि 16 ग्रॅम कार्बोहायड्रेड शरीराला मिळतात. यामुळे जांभूळ हे शरीराला अत्यंत उपकारक समजले जाते. जांभळामुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

नियमित पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर राहते. नियंत्रणात

पेरू : पेरूमधील ग्लिसोमिक इंडेक्स फक्त 20 आहे. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ए यांचे प्रमाणही पेरूमध्ये मोठे असते. या गुणधर्मांमुळे पेरू हा मधुमेहांच्या रुग्णांसाठी अनेक अर्थाने उपयुक्त ठरतो. नियमित पेरू खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर शरीराला ऊर्जा मिळते.

Diabetics and Fruit Intake : सफरचंद खाताना ते सालीसकट खावे

सफरचंद : सफरचंद हे फळही मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट करावे. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंटस् आणि फायबर यांचे प्रमाण मोठे असते. याचबरोबर सफरचंदामध्ये पेक्टीन नावाचे एक रसायन असते. या रसायनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण 50 टक्क्यांहूनही कमी होते. सफरचंदातील ग्लायसेमिक इंडेक्स केवळ 38 आहे. छोटे सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला फक्त 54 कॅलरी आणि 14 ग्रॅम कार्बोहायड्रेड मिळतात. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णांनी सफरचंदाचे सेवन करण्यास हरकत नाही. सफरचंद खाताना ते सालीसकट खावे. याचे कारण सफरचंदाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात.

कलिंगड/टरबूज : कलिंगड अथवा टरबुजामधील ग्लिसेमिक इंडेक्सचे प्रमाण जास्त आहे. मात्र, टरबुजामधून मिळणारी नैसर्गिक साखर शरीराला अत्यंत उपयुक्त असते. टरबुजामध्ये कार्टिनॉईड्स नामक पदार्थ असतो. या पदार्थामुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधुमेहापासून शरीरावर होणार्‍या दुष्परिणामांची तीव—ता कमी करण्यासाठी टरबुजामधील लिकोपिन नावाचा घटक मोठ्या प्रमाणात आहे.

संत्री : अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेच्या मतानुसार मधुमेह असलेल्या रुग्णाने दररोज एक संत्रे खाल्ले पाहिजे. संत्र्यामधील ग्लायसेमिक इंडेक्स 35 ते 50 या दरम्यान आहे. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. या फायबरमुळे आपल्या शरीराची पचनशक्ती वाढते. त्याबरोबरच संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस्चे प्रमाणही मोठे आहे.

पपई : पपई हे फळही मधुमेहांच्या रुग्णांना उपयुक्त ठरणारे फळ आहे. ज्यांच्या रक्तशर्करेचे प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांनी पपई खाल्लीच पाहिजे. पपईमुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर पपईमध्ये कॅरोटीन आणि पपाईन नावाचे एन्झाईम असते. त्यामुळे मधुमेहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टळतात.

डाळिंब : डाळिंब गोड असले तरी या फळामधील व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंटस् आणि फायबरचे मोठे प्रमाण लक्षात घेता हे फळ मधुमेहांच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. डाळिंबाचे दाणे मधुमेहांच्या रुग्णांनी खाणे फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही. तसेच डाळिंबामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

फळाचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे फळातील व्हिटॅमिन आणि फायबर यांचा पुरवठा शरीराला होऊ शकतो. ही फळे खाण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांनी आपली औषधेही नियमितपणे घेतली पाहिजेत. स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा कोणी तरी सांगते आहे म्हणून आपली औषधे बंद करू नयेत. आपल्या रक्तशर्करेची तपासणी नियमितपणे करून घ्यावी. फळे खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 डॉ. भारत लुणावत

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news