‘चतूर’ असो किंवा ‘कौवा बिर्याणी’, ‘या’ ७ कलाकारांचे आजही मीम्स होतात व्हायरल

‘चतूर’ असो किंवा ‘कौवा बिर्याणी’, ‘या’ ७ कलाकारांचे आजही मीम्स होतात व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये दरवर्षी हजारो चित्रपट बनतात. यादरम्यान काही चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात, तर काही बॉक्स ऑफिसवर एक दिवसही टिकू शकत नाहीत. या दरम्यान, या फ्लॉप चित्रपटांमधील काही पात्रे आहेत जी सुपरहिट चित्रपटांच्या मुख्य पात्रांपेक्षा अधिक लोकप्रिय होतात. बॉलिवूडमध्ये असे लोकप्रिय कॅरेक्टर आहेत की त्‍यांच्‍या भूमिका करणारे कलाकार आजही त्‍यांच्‍या चित्रपटातील पात्रांच्या नावाने ओळखले जातात.

१- चतूर (3 Idiots)

बॉलिवूड चित्रपट '3 इडियट्स' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील 'रॅंचो' असो किंवा 'व्हायरस', प्रत्येक पात्रात वेगळपण आहे. पण या चित्रपटातील 'चतूर रामलिंगम' उर्फ ​​'सायलेन्सर' पात्र आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही व्यक्तिरेखा ओमी वैद्य याने साकारली आहे. ओमी आजही इंडस्ट्रीत 'चतुर' या नावाने ओळखला जातो.

२. मिलीमीटर (3 Idiots)

थ्री इडीयट्स चित्रपटातील 'रॅंचो', 'व्हायरस' आणि 'सायलेन्सर' व्यतिरिक्त आणखी एक पात्र खूप गाजले. या पात्राचे नाव होतं 'मिलीमीटर'. 'मिलीमीटर' उर्फ ​​'मनमोहन' चे हे मजेदार पात्र राहुल कुमारने साकारले होते. आजही चाहते राहुलला फक्त 'मिलीमीटर' नावानेच ओळखतात.

३. कचरा (Lagan)

आमिर खानच्या 'लगान' या सुपरहिट चित्रपटात फक्त 'भुवन'च नाही तर 'कचरा' ही व्यक्तिरेखाही खूप गाजली. ही व्यक्तिरेखा आदित्य लखियाने साकारली होती. त्याचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत असेल. आजही लोक आदित्यला 'कचरा' याच नावाने ओळखतात.

४- परपेंडिकुलर (Gangs Of Wasseypur 2)

अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर 2' या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या, पण सर्वात प्रमुख व्यक्तिरेखा 'परपेंडिकुलर' होती. ही व्यक्तिरेखा अभिनेता आदित्य कुमारने साकारली होती. आदित्य आजही 'परपेंडिकुलर' या नावानेच लोकप्रिय आहे.

५- कौवा बिर्याणी (Run)

जर तुम्ही अभिषेक बच्चनचा 'रन' पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा, पण अभिषेकसाठी नाही तर 'कौवा बिर्याणी' उर्फ ​​'गणेश'साठी. ही मजेशीर व्यक्तिरेखा विजय राज यांनी साकारली होती. विजय आजही बॉलिवूडमध्ये 'कौवा बिर्याणी' या नावाने ओळखला जातो.

६. पप्पी (Tanu Weds Manu)

कंगना राणौत आणि माधवनचा सुपरहिट चित्रपट 'तनु वेड्स मनू' ही त्यातील पात्रांइतकीच प्रसिद्ध होती. पण या चित्रपटातील 'पप्पी' हे पात्र खूप गाजले. यात दीपक डोबरियालने भूमिका केली होती, दीपक अजूनही 'पप्पी' भाऊ म्हणून ओळखला जातो.

७. मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर (Dhamal)

धमाल हा एक उत्तम विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात एकापेक्षा एक पात्र आहेत, पण 'मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर' अजूनही खास आहे. ही व्यक्तिरेखा विनय आपटे यांनी साकारली होती. विनय अजूनही मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर या नावाने प्रसिद्ध आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news