Nagpur Blast : मृत कामगारांच्‍या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर | पुढारी

Nagpur Blast : मृत कामगारांच्‍या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्‍यांच्‍या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.(Nagpur Blast)

Nagpur Blast : स्फोटात ९ जणांचा मृत्यू…

नागपुरातील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी सकाळी स्फोट झाला. कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागपूरचे पाेलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.

मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः पाेलीस महानिरीक्षक, पाेलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.”

हेही वाचा:

Back to top button