

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. ग्रहांची साथ लाभेल. आत्मविश्वास अनुभवाल. तुमची कार्यक्षमताही वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. बोलताना शब्द जपून वापरा. अन्यथा यश हुलकावणी देईल. कार्यालयात कामकाजात अडचणी येतील; पण संयम ठेवा. प्रेम संबंध अधिक घनिष्ट होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहिल.
वृषभ: श्रीगणेश म्हणतात की, दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या महत्त्वाच्या कामाची योजना करा. दुपारची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असल्याने कामात यश मिळेल. संततीसंबंधी कोणतीही शुभ सूचना मिळाल्याने आनंद होईल. अतिआत्मविश्वास आणि अहंकारामुळे मित्रांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात अडचण येऊ शकते. कामाच्या ठिकाणी ऑर्डर्सच्या तक्रारींमुळे नुकसान होऊ शकते. घरात कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. स्नायूंच्या दुखण्याचा त्रास जाणवेल.
मिथुन : तुमच्यातील दडलेली प्रतिभा ओळखा आणि त्याचा वापर करा. सध्याची ग्रहस्थिती तुम्हाला अद्भुत शक्ती प्रदान करू शकते. यावेळी केलेल्या योजनांमुळे भविष्यात शुभ संधीची शक्यता आहे. बाहेरील लोकांचा हस्तक्षेप तुम्हाला त्रास देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काही बदल करावे लागतील. वैवाहिक जीवनात काही वैचारिक मतभेद असू शकतात.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, विद्यार्थ्यांना स्पर्धेशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर करा. दुपारनंतर अधिक लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सहलीचे नियोजन कराल. काही अनावश्यक खर्च तर होतीलच; पण पैशाशी आवकही चांगली राहिल. तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुम्ही एखाद्यासोबतचे नाते खराब करू शकता. प्रेम संबंध अधिक घनिष्ट होतील. गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास संभवतो.
सिंह : आजची ग्रहस्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामही होऊ शकते. महत्त्वाच्या वस्तू हरविणार नाहीत किंवा चोरीला जाणार नाहीत याची काळजी घ्या. भावनेच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी वादाची शक्यता. पती-पत्नी व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांसोबत वेळ घालवू शकणार नाहीत .आरोग्य उत्तम राहील.
कन्या : आज तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळ मिळेल. नशीब तुमच्या बाजूने आहे. तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर करा. असा सल्ला श्रीगणेश देतात. कधीकधी तुमच्या संशयास्पद हालचालीमुळे इतरांना त्रास होतो. त्यामुळे विचारात लवचिकता ठेवा. व्यवसायात बाहेरील स्त्रोतांकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता. आज तुम्हाला चिडचिड आणि थकवा जाणवेल.
तूळ: श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस योजनाबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचा आहे. कार्यात यश मिळाल्याने मनाला आनंद मिळेल. आळस टाळा. अन्यथा यश हातातून निसटू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. गृह सुधार योजनेचा पुनर्विचार करा. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही व्यवसायात इतर लोकांवर विश्वास ठेवू नका. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध मधुर होतील. तब्येत ठीक राहील.
वृश्चिक : दैनंदिन जीवनात केलेला बदलाचा प्रयत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदेशीर व्यवहार होतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काही जुन्या नकारात्मक आठवणींना उजाळा दिल्यास नातेवाईकांशी असलेले नाते बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचारांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही रागामुळे भावनिक अंतर निर्माण करू शकता. स्वभावातील चिडचिडेपणामुळे थकवा आणि आळस येईल, असे श्रीगणेश सांगतात.
धनु : आज घरातील नूतनीकरण आणि सजावटीबाबतचर्चा होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी बजेट तयार करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. जवळच्या नात्यातील वादामुळे चिंता वाढेल. आज कामाच्या अतिरिक्त ताण असेल. तणावामुळे तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होईल.
मकर : आज तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या आणि अधिक कामाचा ताण असेल. आराम आणि मौजमजेकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नका. स्वविचाराने निर्णय घ्या, असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रवासामुळे पैशाचा अपव्यय होईल.जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
कुंभ : आज संततीच्या समस्येंवर उपाय मिळाल्याने दिलासा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमचे लक्ष वैयक्तिक कामांवर केंद्रित करू शकाल. एखाद्या समाजसेवी संस्थेशीही तुमचे सहकार्य असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. भावांमध्ये मतभेद होऊ शकतात. चालू व्यवसायात चालू कामात नवीन यश मिळेल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. थकव्यामुळे पाय दुखू शकतात.
मीन : कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सन्मान करा. त्यांचे आशीर्वाद तुमचे भाग्य वाढवेल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक कार्याशी संबंधित पूजा घरामध्ये पूर्ण होऊ शकते. राग आणि घाई तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. मुलांसोबत थोडा वेळ घालवल्याने त्यांचे मनोबलही वाढू शकते. कुटुंबियांसोबत मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. आरोग्य चांगले राहू शकते.