Argentina : अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार  | पुढारी

Argentina : अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार 

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण अमेरिकन देशाच्या अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या शक्तिशाली तीव्र वादळाचे पडसाद अर्जेंटिना बंदरातील बहिया ब्लांका येथे उमटत आहेत. या शक्तिशाली वादळामुळे बहिया ब्लांका येथील १३ लोक ठार झाले आहेत. याबाबत बाहिया ब्लँकाचे महापौर फेडेरिको सुसबिलेस यांनी ‘X’ अकाउंटवर  एका पोस्टमध्ये मृतांच्या संख्येची माहिती दिली कआहे. हे शहर अर्जेंटिनाच्या सर्वोच्च धान्य उत्पादक प्रदेशांपैकी एक असलेल्या ब्युनोस आयर्स प्रांताच्या दक्षिणेकडील टोकाजवळ आहे. (Argentina)

एका निवेदनात, राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या कार्यालयाने पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. आणि १५० किमी प्रतितास (९३ mph) पेक्षा जास्त वेगाने आलेल्या विध्वंसक वाऱ्याचा हवाला देत रविवारी (दि.१७) सकाळपर्यंत स्थानिकांनी त्यांच्या घरातच राहावे असे आवाहन केले आहे.

हेही वाचा

Back to top button