हिंगोली : मराठा आरक्षणप्रश्नी औंढा नागनाथ येथे कॅन्डल मार्च | पुढारी

हिंगोली : मराठा आरक्षणप्रश्नी औंढा नागनाथ येथे कॅन्डल मार्च

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथे मराठा आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून कॅन्डल मार्च काढण्यात आला. हा कॅन्डल मार्च नवीन बस स्थानक परिसरातून औंढा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बुधवारी (दि.१) सायंकाळी  काढण्यात आला. यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या.

कॅन्डल मार्चला सुरुवात नवीन बस्थानकापासून सुरुवात करुन ते नवीन बस स्थानकासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणासाठी जीवनदान दिलेल्या समाज बांधवांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

Back to top button