छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलकांकडून आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलकांकडून आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा :  गंगापूर तालुक्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची आज (दि.३०)  दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलकांनी तोडफोड केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आमदार बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत अर्धा तास आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवून ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना खाली उतरून घेतले. पोलिसांनी आंदोलकांना पायी पोलिस स्टेशनमध्ये नेले.

जालन्याच्या अंतरावाली सराटीत मनोज जरांगे- पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक संतप्त झाला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात घुसून कपाटाच्या काचा, फर्निचरची तोडफोड केली. बोर्डावर काठ्या मारुन उपमुख्यमंत्री यांच्या फोटोवर शाई फेकली.

हेही वाचा 

Back to top button