नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : पुढारी वृत्तसेवा – नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना अवमानास्पद वागणूक देणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाकोडे यांनी स्वतः रात्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संबंधित बातम्या – 

खासदार हेमंत पाटील हे २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर मंगळवारी (दि.३) रोजी दुपारी रुग्णालयात गेले होते. तेथे अधिष्ठातांच्या दालनात जाऊन त्यांनी अधिष्ठाता व अन्य डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. तसेच अधिष्ठाता व एका डॉक्टरला शौचालयाची सफाई करावयास लावली. या प्रकाराचे संमिश्र पडसाद उमटले.

याप्रकरणी आधिष्ठातांनी रात्री नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शौचालय साफ करण्यासाठी आपणास धमकावले तसेच व्हिडिओ काढून बदनामी केली. शासकीय कामात अडथळा आणला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अधिष्ठातांना दिलेल्या वागणुकीचे तीव्र पडसाद वैद्यकीय कर्मचाऱ्यांत उमटले आहेत. पाटील यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news