नागपूर : नागपूरात २४ तासात २ तरुणांच्या हत्या | पुढारी

नागपूर : नागपूरात २४ तासात २ तरुणांच्या हत्या

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या उपराजधानीत गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतीच क्षुल्लक कारणावरून बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत विवेकानंद स्मारकाजवळ काल २१ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केली. या प्रकरणाची शाई न वाळताच कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत धर्म नगर येथे किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम धनेश निशाद (वय 21, रा विजयनगर) असे या हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर भूपेंद्र बघमरिया (वय 18 वर्ष रा धर्म नगर ) असे आरोपीचे नाव आहे.

शहरात श्री गणेश विसर्जन होत असल्याने पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. अशात ही घटना मध्यरात्री घडली, या घटनेनंतर जखमी युवक प्रेम धनेश निशादला मेयो शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा 

Back to top button