Sharad Pawar : बारामती ॲग्रोवरील कारवाईसंबंधी बोलू इच्छित नाही : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते कर्जत -जामखेड चे आमदार रोहित पवार यांना बारामती ॲग्रो कंपनी संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यमांनी केलेल्या याच प्रश्नावर शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :
- Sharad Pawar News : पवारांच्या दौर्याने जुन्नरला चौथा उमेदवार मिळणार !
- Rohit Pawar : रोहीत पवार यांना राज्य प्रदूषण नियामक मंडळाचा दणका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज शुक्रवारी(दि.२९) बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे शरद पवार हे या कारवाईच्या संदर्भात कठोर भूमिका घेतील असं दिसत होतं. परंतु, तसं न करता त्यांनी यावर न बोलणं पसंत केलं आहे. शरद पवार हे यावर काय भूमिका घेतात हे देखील आगामी काळात पाहायला मिळेलच. यापूर्वी या कारवाई संदर्भात रोहित पवार यांनी सविस्तर ट्विट करून ही कारवाई सूडबुद्धीने महाराष्ट्रातील दोन नेत्यांनी केली आहे, असे म्हटले होते. आपल्या वाढदिवसाला दिलेले हे गिफ्ट आहे असे आपण समजू परंतु, महाराष्ट्रातील या दोन नेत्यांना जनताच आता निवडणुकीत रिटर्न गिफ्ट देईन हे त्यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक
महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नसल्याचे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण करत आहेत. राज्य सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू, ओबीसींना वाटतं की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊन नये याची नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल.
याबाबत ही काही निर्णय घेऊ असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे. मराठा समाजाला ही आश्वासनं दिली आहेत नक्की यावरून राज्य सरकार काय निर्णय घेत हे तीस- पस्तीस दिवसात कळेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नाही. पुढे ते म्हणाले, पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि धाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.