Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार ३०, २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज तुम्‍ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचं नियोजन होईल, असे श्रीगणेश सांगतात. काही समस्या निर्माण झाल्‍या तरी सावधगिरीने त्यातून बाहेर पडाल. नकारात्मक लोकांचा संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहिल.

वृषभ : जमीन-मालमत्ता आणि गुंतवणूक यासारख्या कामांमध्ये आज व्यस्त राहाल, असे श्रीगणेश म्‍हणतात. सुवार्ता मिळेल. तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. निसर्गासोबत आणि ध्यान केल्‍याने आराम मिळेल. तरुणांना करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. थकवा जाणवेल.

मिथुन : मानसिकदृष्ट्या कणखर व्‍हाल. महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्याने फायदेशीर योजना बनतील. पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारची प्रकरणे निकाली काढू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवर जास्त खर्च झाल्‍याने बजेट बिघडू शकते. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खरेदी आणि आरामाशी संबंधित गोष्टींमध्ये वेळ जाईल.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही उत्सवात व्यस्त राहू शकता. यश मिळाल्याने उत्साह वाढेल. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकार आड येणार नाही, याची काळजी घ्‍या. खूप घाई केल्‍याने एखाद्याशी संबंध खराब करू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते. कौटुंबिक वातावरण मधुर राहिल. आरोग्य चांगले राहिल.

सिंह : आज भाग्य तुमच्या पाठीशी आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळाची चिंता दूर होऊ शकते, ज्यामुळे मनःशांती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होईल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. व्यवसायिक कामे व्यवस्थित चालू राहतील. जोडीदारासोबत काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तणावामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

कन्या : आज स्वप्न साकार होण्‍याचा योग आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश सांगतात. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. काम जास्त होऊ शकते. परिश्रमाच्या ऐवजी, परिणाम कमी असू शकतो. विद्यार्थी विचारात जास्त वेळ घालवू शकतात. त्यामुळे कोणतेही यश हातातून निसटू शकते. व्यावसायिक महिला विशेषतः त्यांच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

तूळ : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या वागण्याने वाईट संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीप्रमाणे नशिबाच्या अपेक्षेने कर्मावर विश्वास ठेवल्याने उत्कृष्ट परिस्थिती निर्माण होईल. काही वेळा तुमचा आनंदी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये अहंकाराबाबत वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहू शकते.

वृश्चिक : काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे तुम्हालाही आत्मसमाधानाची भावना असेल. तरुणांची करिअरबाबतची बेफिकिरी भविष्यासाठी घातक ठरू शकते. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल. पती-पत्नीचे नाते अधिक घनिष्ठ होईल.

धनु : आज अध्यात्मिक कार्यात रस घ्‍याल. वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. विशिष्ट विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकते. व्यावसायिक स्पर्धेत काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. पती-पत्नीचे नाते अधिक गोड होईल.

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवा. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. खूप स्वार्थी असल्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील, असे श्रीगणेश सांगतात. गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. यंत्र किंवा तेलाशी संबंधित व्यवसाय खूप फायदेशीर असू शकतो. जास्त कामामुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही.

मीन : गणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या समज आणि बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. घरात मित्र किंवा पाहुणे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देऊ नये. अन्नाशी संबंधित व्यवसाय हळूहळू व्यवस्थित होत आहेत. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news