लगे रहो! 'त्या' व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार | पुढारी

लगे रहो! 'त्या' व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( दि.२४) नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी एका व्यक्तीला फडणवीस ओढत असल्याचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे. यासंदर्भात फडणवीस यांच्या कार्यालयाने हा व्हिडिओ शेअर करीत प्रत्युत्तर दिले आहे.

सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा! पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…! या शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

हेही वाचा 

Back to top button