Parliament Special Session | संविधानाच्या प्रस्तावनेतून 'हे' दोन महत्त्वाचे शब्द वगळले; अधीर रंजन चौधरींचा आक्षेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल (दि.१९ सप्टेंबर) मोठ्या दिमाखात नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज महिला आरक्षण विधेयकाची घोषणेची कार्यवाही करत सुरू झाले. तत्पूर्वी संसदेच्या सर्व खासदारांना संविधानाच्या प्रती देण्यात आल्या. मात्र संविधानाच्या नवीन प्रतींच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द वगळण्यात आल्याचा आक्षेप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी नोंदवला आहे. (Parliament Special Session)
आपण काल नवीन संसद भवनात जी संविधानाची प्रत घेऊन आपण फिरत होतो. त्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द नव्हते. हे दोन शब्द घटनेत नसतील तर, ही चिंताजनक बाब आहे. प्रस्तावनेतील या शब्दांची त्यांना समस्या असल्याने सरकारने हा बदल अतिशय ‘चतुराईने’ केला आहे. असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला. (Parliament Special Session)
#WATCH | On his claim that the new copies of the Constitution that were given to them, its Preamble didn’t have the words ‘socialist secular’, Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury says, “..When I was reading it, I couldn’t find these two words. I added them… pic.twitter.com/lCwdKtRsYV
— ANI (@ANI) September 20, 2023
Parliament Special Session : राज्यघटना बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी संविधानासंदर्भात केलेल्या दाव्यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, मी जेव्हा नवीन संसद भवनात देण्यात आलेले संविधान वाचत होतो, तेव्हा मला ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द सापडले नाहीत. मी माझ्या भाषणात ते स्वतःहून जोडले. पुन्हा हे मी राहुल गांधींनाही दाखवले. 1976 मध्ये घटनादुरुस्ती करून हे शब्द समाविष्ट करण्यात आले होते, मग ते आज घटनेत का मिळू नयेत. आम्ही दुरुस्त्या का करू? यावरून आपली राज्यघटना बदलण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न दिसून येतो, असेही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.