

कापोली – श्रीवर्धन (जि. रायगड) : विजय कांबळे : भारताच्या प्राचीन संस्कृतीचे आकर्षण परदेशात मोठ्या प्रमाणात असल्याचे आजवर अनेकदा समोर आले आहे. आता इंडोनेशियातील सांतानुदेवी या युवतीने भारतीय संस्कृती आणि रीतीरिवाजाच्या प्रेमात पडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील भारत मुरलीधर पाटील याच्या सोबत विधिवत विवाहबद्ध होऊन भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.
संबंधित बातम्या :
भरडखोल गावातील मुरलीधर लाया पाटील यांचा मुलगा भारत याने पारंपरिक भारतीय संस्कृतीने इंडोनेशियातील पुतनुरासांभा तबानन बाली यांची कन्या सांतानुदेवी हिच्या सोबत भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात हा विधिवत विवाह कोळी समाजाच्या पद्धतीने अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कोळी समाजातील मुलाचा परदेशातील मुलीबरोबरचा हा बहुदा पहिलाच विवाह असावा. परिणामी, या आंतरराष्ट्रीय विवाहाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भारत पाटील याने हॉटेल मॅनेजमेंट विषयता पदवी संपादन करून तो नोकरीच्या निमित्ताने परदेशात मालदीव येथे कार्यरत होता. हॉटेल मॅनेजमेंट पदवी संपादन केलेली सांतानुदेवी ही देखील त्याच ठिकाणी नोकरी करत होती. तिथेच सांतानुदेवी बरोबर भारतची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेऊन ही गोष्ट आपापल्या आई-वडिलांना सांगितली. दोघांचाही हट्ट असल्याने उभयतांच्या आई-वडिलांनी विवाहास रितसर परवानगी दिली.
हेही वाचा :