२०१४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सपा खासदार आझम खान यांच्या डेअरी फार्ममधून ७ म्हशी चोरीस गेल्या हाेत्या. त्यांना रामपूर पोलिसांनी शोधले होते. या कारवाईनंतर रामपूर पोलिस चर्चेत आले होते. आता पुन्हा रामपूर पोलिस चर्चेत आले आहेत. याच कारणही तसंच वेगळ आहे. आता एका काँग्रेस नेत्याची घोडी बेपत्ता झाली असून तिचा शोध घेण्याची जबाबदारी आता रामपूर पोलिसांवर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष हाजी नजीश खान यांची घोडी शुक्रवारी (५ नोव्हेंबर) रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. त्यांनी तोफखाना येथे असलेल्या लालाच्या मिलजवळ पाळीव घोडी बांधली होती. बेपत्ता झाल्यानंतर गोडीची चोरी झाल्याचा संशय व्याक्त केला आहे. नाजीश खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती दिली . याची दखल घेत वरिष्ठ पाेलिसांनी अधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी ऑनलाइन एफआयआर नोंदवून घेतला आहे. नाझीश खान यांनी ही घोडी ८२ हजार रुपयांना विकत घेतली हाेती. ती माझ्या कुटुंबाचा एक भाग झाली आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
३१ जानेवारी २०१४ रोजी उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबीनेट मंत्री आणि रामपूरचे खासदार आझम खान यांच्या डेअरी फर्ममधून सात म्हशीची चोरी झाली होती. या प्रकरणाची दखल घेत त्यावेळी तत्कालीन एसपींनी तीन पोलिसांना निलंबितही केले होते.या प्रकरणाची दखल घेत रामपूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी या म्हशीचा २४ तासांच्या आत शोध लावला होता.
याशिवाय रामपूरचे जिल्हा दंडाधिकारी असलेले अमित किशोर यांचा पाळीव कुत्राही बेपत्ता झाला होता. जर्मन शेफर्ड जातीचा हा कुत्रा पोलिसांनी २४ तासात शोधला होता. आता रामपूर पोलिस काँग्रेस नेत्यांच्या बेपत्ता घोडीचा शोध घेणार आहेत.