Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांचा आजपासून पाणी त्याग | पुढारी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांचा आजपासून पाणी त्याग

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासंदर्भातील वंशावळीची अट काढून टाकण्याबाबतचा सुधारित जी.आर. राज्य सरकारने काढलेला नसल्याने उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी (दि. ९) जाहीर केला. तसेच आजपासून सलाईन लावून घेणार नाही आणि पाणीही सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

शुक्रवारी रात्री अडीचपर्यंते जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीची माहिती आणि बंद लिफाफा जरांगे-पाटील यांना शनिवारी देण्यात आला. सरकारने जी.आर.मध्ये कुठलाही बदल केलेला नाही किंवा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे आपले उपोषण सुरूच राहील, असे जरांगे-पाटील यांनी जाहीर केले.

हेही वाचा : 

Back to top button