उत्तराखंड : देवदर्शनाहून येत असताना ५० फूट खोल दरीत बस कोसळली; ८ भाविकांचा मृत्यू | पुढारी

उत्तराखंड : देवदर्शनाहून येत असताना ५० फूट खोल दरीत बस कोसळली; ८ भाविकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तराखंडमध्ये रविवारी रात्री उत्तरकाशी-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ चालाकाचा ताबा सुटल्‍याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्‍यु झाला आहे. तर 27 प्रवाशी यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व भाविक गुजरातचे असल्‍याची माहिती देण्यात आली आहे.

गुजरातमधून ३३ भाविक बसमधून देवदर्शनासाठी येत होते. संध्याकाळी ही बस उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावरील गंगनानीजवळ आली असता चालकाचा ताबा सुटल्‍याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. रात्री हा अपघात झाल्‍याने बचावकार्य पथकास अडचणी येत होत्या. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य केले. या अपघातातील 27 जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्यापही या परिसरात बचावकार्य सुरू आहे. अशी माहिती अधिका-यांनी दिली.

.हेही वाचा 

E-passport : दोन महिन्यांत मिळणार चिप बसवलेले ई-पासपोर्ट

सांगली : जतमध्ये किरकोळ कारणावरून दोघांना गंभीर मारहाण; सशयित आरोपी फरार 

‘पद्म’साठी अभिनेते अशोक सराफ यांची शिफारस करणार

Back to top button