सांगली : जतमध्ये किरकोळ कारणावरून दोघांना गंभीर मारहाण; सशयित आरोपी फरार | पुढारी

सांगली : जतमध्ये किरकोळ कारणावरून दोघांना गंभीर मारहाण; सशयित आरोपी फरार

जत; पुढारी वृत्तसेवा : गुड्डापूर (ता.जत) येथे पुतण्याने चुलत्याला आमच्या दुकानासमोर का आला होता असा जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी चुलत्यासह अन्य एका व्यक्तीवर पुतण्याने मोटरसायकलच्या चैनीने व दगडाने गंभीर मारहाण केली. यात एक जण मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी प्रकाश कृष्णा माने (वय ३५ ) याच्यावर जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद खंडू विठोबा माने यांनी दिली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, सशयित आरोपी प्रकाश कृष्णा माने यांनी खंडू माने यांच्या घरासमोर शुक्रवारी सायंकाळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जाऊन तू माझ्या दुकानासमोर दोन दिवसांपूर्वी का आला होता? असा जाब विचारत मोटरसायकलच्या चैनीने व दगडाने गंभीर मारहाण केली. तसेच सदरची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सुरज धनाप्पा माने (व२८) यास दगडाने जबर मारहाण केली आहे. जखमी सुरजवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकाशने पुन्हा धानाप्पा माने यांच्या घराजवळ जाऊन त्यांच्या घराची भिंत पाडून शेडनेट याचे मोठे नुकसान केले आहे व घरातील दोघी महिलांना देखील शिवीगाळ केली आहे. प्रकाश माने हा कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या मोबाईल स्टेटस वर धारदार शस्त्रे ठेवण्याची चर्चा गुड्डापूर परिसरात सुरू होती.सदरची घटना नोंद आसून आधिक तपास पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.

Back to top button