

पुढारी ऑनलाईन डेस्क : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासियांनी आपल्या सोशल मीडिया प्लॉटफॉर्मचा डीपी बदलावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१३) सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. डीपी बदलून या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया ज्यामुळे आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. त्यांनी तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवला आहे. देशवासियांनीही आपल्या सोशल मिडियाचा डीपी बदलण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवरून केले आहे.