Malpuva recipe : रसरशीत मालपुवा कसे कराल?  | पुढारी

Malpuva recipe : रसरशीत मालपुवा कसे कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी, मालपुवा, मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘मालपुआ’ रेसिपी (Malpuva recipe) पाहूया…

 

साहित्य 

१) १०० ग्रॅम खवा

२) ५० ग्रॅम मैदा आणि रवा

३) ५० ग्रॅम

४) दीड चमचा जाडसर कुटलेली बडीशेप

५) छोटा चमचा वेलची पावडर

६) तळण्याासाठी तूप

७) एक कप दूध

८) चार कप साखर

९) एक पाणी, केसर

कृती 

१) एक बाऊल घेऊन त्यात मैदा आणि रवा मिक्स करून त्यात खवा कुस्करुन टाका. नंतर त्यात दूध घालून गुठळ्या होणार नाही याची दक्षता घेऊन मिश्रण सरसरीत करून घ्या.

२) वेलची पावडर आणि बडिशेप घालून ते मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून १५ मिनिटं बाजूला ठेवा.

३) मध्यम गॅसवर पॅन ठेवून १ कप पाणी उकळत ठेवा, त्यात साखर घालून विरघळून घ्या. हा साखरेचा पाक हलका चिटक करून घेऊन आणि त्यात केसरचे धागे घाला. २ मिनिटं पाक शिजवून घ्या.

४) त्यानंतर गॅसवर कढईत तूप तापत ठेवा. मालपुआ तळण्यापूर्वी तूप तापलेलं आहे की, नाही ते तापसून घ्या. त्यासाठी मालपुवाचे थेंब टाकून पहा.

५) त्यानंतर मालपुवाचे एक डावाने (मिश्रण) अलगद तूपात सोडा. ते आपोआप तळाशी जाऊन फुलते आणि त्याला छोट्या पुरीचा आकार प्राप्त होतो.

६) मालपुवाला सोनेरी रंग प्राप्त होऊन तूपात तरंगू लागला की, पलटी मारून तळून घ्या. साधारणपणे ३ मिनिटं तळण्यासाठी लागतात.

७) तळून झाल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये २ मिनिटं बुडवून ठेवा. साखरेचा पाक हा जास्त गरम आणि थंडही असता कामा नये. तो हलका गरम असावा. त्याच्याने मालपुवा हा पाक शोषून घेतो.

अशाप्रकारे स्वादिष्ट मालपुवा (Malpuva recipe) थंडगार रबडीसोबत खायला तयार आहेत. मंद गॅसवर मालपुवा तळले की, टेस्टी लागतात.

पहा व्हिडिओ : खुसखुशीत खमंग चकली रेसिपी आणि टिप्स

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button