Shankarpali : खुसखुशीत शंकरपाळी कशी कराल? | पुढारी

Shankarpali : खुसखुशीत शंकरपाळी कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी (Shankarpali), कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘शंकरपाळी’ रेसिपी पाहू या…

Shankarpali

साहित्य

१) एक किलो मैदा

२) एक वाटी तूप

३) दोन वाटी पिठी साखर

४) तेल

५) दूध

Shankarpali

कृती

१) मध्यम गॅसवर एका भांड्यात दूध आणि पिठीसाखर एकरूप होण्यासाठी ठेवा. गॅस विरघळी की, गॅस लगेच बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.

२) परातीत मैदा घ्या आणि गरम केलेले तूप घाला. मैदा छान फसफसला पाहिजे. कारण, त्यामुळे शंकरपाळी खुसखुसशीत होते.

३) मैदात तूप, साखर आणि दूध एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या. नंतर मळलेल्या पिठाला अर्धा तास बाजुला भिजत ठेवा.

४) आता त्या पीठाचे छोटे-छोटे एकसारखे गोळे करून पोळी लाटून घ्या. त्यानंतर चिरण्याने एकसारखे काप करून घ्या आणि एका कागदावर त्या काप काढून घ्या.

५) गॅसवर कढई ठेवून त्यात तेल चांगले गरम करा. त्यानंतर हलक्या हाताने शंकरपाळ्याचे काप सोडा. ३-४ मिनिटं ते सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत तळून घ्या.

६) अशाप्रकारे तुमची कुरकरीत शंकरपाळी तयार झाली. ही शंकरपाळी (Shankarpali) २०-२५ दिवस चांगली टिकते.

पहा व्हिडीओ : मुंबईची चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी बनवाल?

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button