Besan Laddu : खमंग बेसणाचे लाडू कसे तयार कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू (Besan Laddu), चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडीस मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘बेसण लाडू’ रेसिपी पाहू या…
बेसणाच्या लाडूसाठीचे साहित्य
१) दोन वाटी बेसण
२) पाऊण कप तूप
३) चार कप पिठी साखर
४) अर्धा चमचा वेलची पावडर
५) तीन-चार चमचे दूध
६) आवडीनुसार ड्रायफूड्स
टीप : तुम्ही मधुमेहाचे (डायबेटीज) पेशंट असाल आणि साखर तुम्हाला वर्ज्य असेल, तर साखरेऐवजी खारकाची (सुखलेले खजूर) पावडरदेखील आपण वापरू शकता.
बेसणाचा लाडू करण्याची कृती
१) बेसणचा लाडू तयार करण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तूप आणि बेसण मिक्स करा.
२) ३० ते ४० मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत बेसण चांगला भाजून घ्या. त्यानंतर थोडासा सुंगध येऊ लागले. गरम असतानाच दूध टाकले की, लाडू छान होतात.
३) त्यानंतर भाजलेलं बेसण एका परातीत काढून घ्या आणि त्याला किमान २ तास तरी थंड होऊ द्या.
४) त्यात ड्रायफूड्स (बदाम, काजू, पिस्ता…) घाला.
४) त्यानंतर पिठीसाखर आणि वेलदोड्याची पावडर मिक्स करा.
५) बेसणात टाकलेले सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की, लाडूचे पीठ थोडे पातळ झाल्यानंतर लाडू वळावेत.
पहा व्हिडीओ : मुंबईची चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी बनवाल?
या रेसिपी वाचल्यात का?
- Tikhat Shev Recipe : दिवाळीची तिखट शेव कशी कराल?
- Chiwda Recipe : दिवाळीचा खमंग चिवडा कसा कराल?
- Diwali Recipe : कुरकुरीत आणि खमंग चकली कशी कराल?
- Karanji Recipe : कुरकुरीत करंजी कशी कराल?
- Shankarpali : खुसखुशीत शंकरपाळी कशी कराल?