Laddu Recipe : रव्याचे स्वादिष्ट लाडू कसे कराल?  | पुढारी

Laddu Recipe : रव्याचे स्वादिष्ट लाडू कसे कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये लाडू (Laddu Recipe), चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडीस मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘रव्याचे लाडू’ रेसिपी पाहू या…

Laddu Recipe

साहित्य

१) पाचशे ग्रॅम रवा

२) चार काजू आणि चार बदामाचे काप

३) चार बेदाणे, ७-८ बारीक केलेली वेलची

४) तीनशे ग्रॅम पिठीसाखर

५) अर्धा कप तूप आणि जायफळ पावडर

६) तीन टेबलस्पून खसखस आणि तेल

Laddu Recipe

कृती

१) मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात खसखस भाजून घ्या. नंतर त्यात तूप घालून काजू-बदामाचे काप टाकून तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

२) एका भांड्यात तूप घेऊन त्यात रवा घाला. जोपर्यंत आपल्या मुठीसारखा रव्याचा गोळा होत नाही तोपर्यंत त्यात तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

३) त्यानंतर भाजून घेतलेले काजू, बदाम, जायफळ पावडर, अर्धा कप तूप, वेलची, पिठीसाखर घालून एकजीव करून घ्या.

४) व्यवस्थित रवा आणि इतर पदार्थांचे मिश्रण झाल्यानंतर त्याचे हलक्या हाताने लाडू बांधून घ्या. सर्व लाडू एकसारख्या आकाराचे बांधा. त्यानंतर हे लाडू भाजलेल्या खसखसीमध्ये घोळून घ्या.

अशाप्रकारे तुमचे दिवाळीतील स्वादिष्ट रव्याचे लाडू (Laddu Recipe) तयार झाले आहेत. बांधलेले लाडू एक बंद डब्यात घालून ठेवा. हे लाडू तुम्ही १५ दिवसांपर्यंत खाऊ शकता.

पहा व्हिडीओ : महाराष्ट्र आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृती पासून बनवला तंदुरी वडापाव

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button