Newsclick: हवाला प्रकरणी ‘न्यूज क्लीक’ पोर्टलला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

 Delhi High Court
Delhi High Court

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: चीनचा पैसा घेऊन देशाची बदनामी करीत असल्याचा गंभीर आरोप झालेल्या न्यूज क्लीक वेब पोर्टलला दिल्ली उच्च न्यायालयाने हवाला प्रकरणात नोटीस बजावली आहे. येत्या दोन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोर्टलला दिले आहेत. पोर्टलचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

'न्यूज क्लीक' म्हणजे पेड न्यूजचा गंभीर प्रकार असून, या पोर्टलला कोट्यवधी रुपये प्राप्त होत आहेत. परिणामी सदर प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती ईडीकडून उच्च न्यायालयाकडे करण्यात आली. याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये ईडीने 'न्यूज क्लीक' च्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तत्पूर्वी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पोर्टलविरोधात गुन्हा नोंदविला होता. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news