नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरकारने मंगळवारी राज्यसभेसत असं सांगितलं की, 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', योजनेसाठी देण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी ५८ टक्के रक्कम ही केवळ प्रचारासाठी खर्च करण्यात आली आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं की, "बेटी बचाओ, बेटी पढाओ, योजनेतर्गंत २०१४ पासून २०२१ पर्यंत ६८३.०५ करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. ज्यामधील ४०१.०४ करोड रुपये अर्थात ५८ टक्के रक्कम ही केवळ प्रचारासाठी वापरण्यात आली आहे.
केंद्रीय स्मृती इराणी संसदेत म्हणाल्या की, "बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचे ध्येय बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण आणि महिला व मुलींचे सक्षमीकरण, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण करणे आहे. मुलींच्या हक्काबद्दल जागृती करणे, मुलींच्या शिक्षण आणि विकासासाठी प्रयत्न करणे, जन्मावेळी लिंगतपास करण्यावर रोख लावणे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात", असं मत स्मृती इराणी यांनी संसदेत मांडलं आहे.
"सुरुवातीच्या टप्प्यावर जागृकतेसाठी आणि मुलींचे महत्व देण्याच्या दिशेने समाजाचा पारंपरिक विचार परिवर्तनाच्या दृष्टीने जाहिरातीवर खर्च करण्यात आला. मागील दोन वर्षांमध्ये केंद्रीय स्तरावर जाहिरातावरील खर्च कमी करण्यात आला असून आता प्रत्यक्ष मत परिवर्तनासाठी प्रयत्न केले जातील", असंही केंद्रीय मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
हे वाचलंत का?