नाशिक : दहशत पसरविणारा संशयित कोयताधारी ताब्यात | पुढारी

नाशिक : दहशत पसरविणारा संशयित कोयताधारी ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

धारदार कोयता बाळगून दहशत पसरविणाऱ्या संशयिताच्या मुसक्या इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या आहेत. श्याम यशवंत जाधव (23, रा. समर्थनगर, म्हाडा कॉलनी, वडाळा-पाथर्डी रोड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित जाधव हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास अंजना लॉन्समागे स्वराज्यनगरकडे जाणाऱ्या कॉलनी रोड परिसरात धारदार लोखंडी कोयता घेऊन दहशत माजवित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा दोन फूट पाच इंच लांबीचा धारदार कोयता हस्तगत केला असून पोशि संतोष कोरडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button